कळंब /  प्रतिनिधी-

 कोरोना या महाभयंकर साथरोगात कर्तव्य बजावलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांनी,महामारी योद्धा संघर्ष समिती च्या माध्यमातून शासकिय उपजिल्हारूग्णालय  ते तहसिल कार्यालय असा पी . पी . किट परिधान करून  आज दि. ३ रोजी  मोर्चा काढला,

 मोर्चा दरम्यान शासन सेवेत कायम करण्यात यावे याबाबतच्या घोषणा देण्यात आल्या. या मोर्चाचे नेतृत्व महामारी योद्धा संघर्ष समितीचे  प्रमुख संतोष भांडे यांनी केले तर दिपक लांडगॆ,विद्याधर काटे,कविता अबुज,आकाश पलंगे,कविता तांबारे,अजित कसबे,रूपेश  कांबळे, यांना अशोक धोंगडे श्रीदेवी वाघमारे सुनिता जाधव बाकले सिस्टर सुप्रिया बोंदर मते सिस्टर मीनाक्षी शिंदे गिरी सिस्टर बातमी सिस्टर यांपदाधिकाऱ्यांसह शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.प्रशासनाच्या वतीने तहसिलदार .मुस्तफा खोंदे यांनी निवेदन दिले .


 
Top