उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील सारोळा येथील शेतकऱ्यांनी पीकविमासह अतिवृष्टीचे अनुदान तातडीने खात्यावर जमा करावे यासह आ. कैलास पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून गांधीगिरी पध्दतीने आंदोलन केले. स्वतःला जमिनीमध्ये गाढून घेऊन शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. दरम्यान तहसीलदार गणेश माळी यांनी आंदोलकांची भेट घेवून आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

जिल्हयातील शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा, अनुदान मिळावे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी सारोळा गावातील तरूण शेतकऱ्यांनी जमिनीत स्वतःला काढून घेत आंदोलन केले. मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी व आ. कैलास पाटील यांच्या आंदोलनास पाठींबा म्हणून हे अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. सकाळी आठ वाजेपासून सुरू झालेले आंदोलन दुपारी तीन वाजेपर्यंत करण्यात आले. दरम्यान तहसीलदार गणेश माळी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्याची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान काही आंदोलकांची तब्येत बिघडल्याचे दिसून आले. 

यावेळी विनोद बाकले, वैभव पाटील, सावन देवगिरे, प्रसाद मसे, अमोल मिटकरी, बालाजी पडवळ, विनोद साळुंखे, रामचंद्र विधाते, नवनाथ खरे, छत्रपती रणदिवे, धैर्यधर पाटील, श्रीकांत रणदिवे, विकास बाकले, सुधाकर मसे, सुरेश कोल्हे, ज्ञानदेव मसे, नंदू मसे, अप्पा मसे, नामदेव खरे, सुहास रणदिवे, अजय पाटील, नवनाथ माळी, अशोक मसे, दिपक शिंदे, रवि नाडे, राकेश कठारे, अण्णा चंदने, दिपक रणदिवे, जयलिंग इसाके, पंकज लिंगे, विशाल बाकले, सुरज रणदिवे, श्रीरंग कठारे, संजय पवार, भागवत जटाळे, सतीश इसाके, सौदागर बाकले, विजयकुमार पाटील, महेश इसाके, आकाश शिंदे, दादा गाढवे, दत्ता माळी, बिभीषण शिंदे, महेश वाघमारे, मन्मथ इसाके आदींसह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top