उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 विजयादशमी या दिनी प्रभू रामचंद्र यांनी दुष्ट शक्ती असलेल्या रावणाचे वध करून दहन केले होते. त्याचप्रमाणे देश व राज्यातील १० तोंडी सरकारने दुष्ट हेतू ठेवून देशावर व राज्यावर महागाईसह सर्व प्रकारचे संकट निर्माण केले आहे. त्यामुळे केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या दुष्ट व्यक्तींच्या शक्तीचे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीरपणे प्रतिकात्मकरीत्या दहन करीत दि.५ ऑक्टोबर रोजी निषेध नोंदविला आहे.

 या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद तालुकाध्यक्ष श्याम घोगरे, तालुका उपाध्यक्ष विलास पडवळ, विराट पाटील, प्रशांत फंड, दशरथ माने, अमरसिंह देशमुख, महिला तालुकाध्यक्ष रंजना भोजने, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पवार, तालुका कोषाध्यक्ष आदम शेख, युवक  तालुकाध्यक्ष प्रवीण लाडुळकर, युवक जिल्हा सचिव संभाजी कांबळे, अजयकुमार कोळी, लीगल सेलचे शहराध्यक्ष ॲड.योगेश सोन्ने पाटील, विद्यार्थी तालुका सचिव सागर गाढवे, बालाजी शिंदे, तालुका सहसचिव बलभीम गरड, किसान सेलचे अरुण माने, नजीब मासूलदार, आनंद खोबरे, सिकंदर खतीब यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top