उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) च्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त डाक विभाग दरवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करतो. ज्याची सुरुवात जागतिक टपाल दिन (9 ऑक्टोबर) पासून होते. यंदाच्या जागतिक टपाल दिनाची संकल्पना ‘पोस्ट फॉर प्लॅनेट’ आहे.

 या वर्षाच्या टपाल सप्ताहामध्ये 09 ते 13 ऑक्टोबर 2022 या कालावधीत उस्मानाबाद डाक विभागाने समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत डाक विभाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी विविध खाते उघडणे शिबिरे, टपाल जीवन विमा कॅम्प, आधार कॅम्प, फिलाटली सेमिनार, सामाजिक सुरक्षा योजनांवरील शिबिरे अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे.

 तरी जिल्ह्यातील सर्व जनतेने या कालावधी मध्ये आपल्या जवळील टपाल कार्यालयाला भेट देऊन डाक विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उस्मानाबाद विभाग मुख्यालय लातूरचे डाक अधीक्षक डॉ. श्री बी. एच. नागरगोजे यांच्या कडून करण्यात येत आहे.


 
Top