तेर/ प्रतिनिधी   

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तेर ता .उस्मानाबाद येथील ग्रामीण रुग्णालयात तेरणा पब्लिक चँरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा सुपर स्पेशालिटी हाँस्पिटल व रिसर्च सेंटर नेरुळ यांच्या वतीने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या शिबिरात तेरसह परिसरातील 325  नागरिकांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले .

 प्रारंभी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते धनवंतरी च्या प्रतीमेची पुजन केल्यानंतर  शिबिराचे उद्घाटन पद्माकर फंड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच नवनाथ नाईकवाडी होते  .यावेळी तेरणाचे   वैद्यकीय अधिकारी डॉ.  दिपक बाराते  , वैद्यकीय अधिकारी डॉ.सचीन कोठावळे  , रूग्ण  कल्याण समितीचे सदस्य जुनेद मोमीन ,  रूग्ण कल्याण समितीचे सदस्य सुभाष कुलकर्णी  , भास्कर माळी यांची प्रमुख उपस्थिती होती 

या शिबिरात हस्थिरोग नेत्ररोग बालरोग स्त्रीरोग त्वचारोग अस्थिरोग कान नाक घसा व पोटाच्या विकारासंबधीत रुग्णांवर मुंबई येथील तज्ञ डाँक्टर अजित निळे , डॉ.अब्दुल्लाह तारीक , डॉ.अंकीत टाव्हरे , डॉ.किरण जोशी , डॉ.बनश्री पटेल    डॉ.अंशिका दुबे , श्रुती वालसन , डॉ.मृदुला व्यास ,  डॉ.स्नेहल क्षिरसागर , जनसंपर्क अधिकारी विनोद ओहाळ  ,  सचीन व्हटकर , पवन वाघमारे , निशिकांत लोकरे यांनी रूग्णांची तपासणी व औषधोपचार करण्यात आला यावेळी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सचिन व्हटकर , प्रा तुळशिराम उकिरडे , डॉ शरद कांबळे ,  विनोद कसबे , शुभम वैरागे , अजित थोडसरे , हरशाद मुलांनी ,  संगीता चव्हाण , आशा स्वयंसेविका कविता आंधळे ,  पौर्णिमा झाडे , रेखा पांगरकर , रेश्मा नानजकर , मिरा गाढवे , राणी शिराळ  आदि

 
Top