उस्मानाबाद /  प्रतिनिधी- 

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना,महाराष्ट्र यांच्या वतीने काल महाराष्ट्रातील आठ व्यक्तींना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2022 जाहीर करण्यात आला.यामध्ये मराठवाड्यातून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांना महाराष्ट्र महा गौरव पुरस्कार 2022 जाहीर करण्यात आल्याचे पत्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झाले.महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलून समाजापुढे आदर्श ठेवलेल्या राज्यातील आठ मान्यवरांना “महाराष्ट्र महा गौरव पुरस्कार 2022” मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करून त्यांचा सन्मान करणार आहेत. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूमिपुत्राला प्राप्त झाल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांचे पहिले अधिवेशन 29 ऑक्टोबर 2022 रोजी महाबळेश्वर भिलार येथे होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते होणार असून यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील तर अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शंभूराजे देसाई व कार्याध्यक्ष म्हणून खासदार श्रीनिवास पाटील व श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 
Top