उमरगा / प्रतिनिधी-

सालेगाव येथील  युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्थीविहार स्मारकाच्या कामाची सहाय्यक समाज कल्याण आयुक्त बी. जी. अरावत यांनी   पहाणी केली.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त निवडक अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेअंतर्गत सालेगाव  येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे त्याची पहाणी करून संबंधित ठेकेदार यांना त्यानीं सूचना दिल्या. 

  या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन यांचा आराखडा तयार करण्यात येणार असून लगेच त्या कामाला लागणार असल्याचे सहाय्यक आयुक्त अरावत यांनी सांगितले या वेळी समाजकल्याणचें विस्तार अधिकारी युवराज भोसले, कार्यालय निरीक्षक, श्री.मगर,अण्णाराव भालेराव, जी.एल.कांबळे, श्रीमंत भालेराव,सुनील भालेराव, रितेश भुतकर,नितीन कांबळे आदी उपस्थित होते 

 
Top