उस्मानाबाद / प्रतिनिधी-

देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी  किशोरी, गर्भवती आणि स्तनदा माता तसेच 0 ते 6 वर्षाच्या आतील मुलांच्या पोषण आहारामध्ये सुधारणा आणण्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियानाचा एक महत्वपुर्ण उपक्रम हाती घेतला आहे.

 आज धाराशिव नगरपालिकेतील अंगणवाडी क्रमांक 60 मध्ये  सिडीपीओ कड सर आणि सुपरवायझर अस्मिता गजभारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांसाठी राष्ट्रीय पोषण अभियानाचा उपक्रम राबविण्यात आला आणि प्रमुख पाहुण्या म्हणून भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अर्चनाताई अंबुरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. सुपरवायझर गजभारे मॅडम यांनी किशोरी, गर्भवती तसेच स्तनदा माता यांच्या सकस आणि समतोल आहारावर भाष्य केले तर अर्चनाताई अंबुरे यांनी अंगणवाडीसेविकांच्या सर्व अडचणी जाणून घेतल्या तसेच लाभार्थी महिलांनी सुकडी वाटपाऐवजी कडधान्ये स्वरूपात धान्य पुरवावे अथवा लाभार्थ्यांच्या खात्यावर केंद्र सरकारने डायरेक्ट पैसे जमा करावे ही आग्रही मागणी माझ्याकडे केली.  अंगणवाडी संदर्भात महत्वाचे सर्व प्रश्न एक महिला पदाधिकारी म्हणून आदरणीय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्याबाबत आश्वस्त केले. 

त्यावेळी अंगणवाडी सेविका सीमा उंडाळे, अर्चना वीर,  बालिका यादव, वर्षा करंजकर, सविता खोत, लक्ष्मी गोरवे,पल्लवी जाधव, तबसुम शेख,स्वाती सरवदे, जयश्री कोनाळे,माधवी आंधळे,ताराबाई सुर्यवंशी इत्यादी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस उपस्थित होत्या.

 
Top