उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 इनगोंदा, (ता. परंडा) येथील- मरिबा शंकर रंदिल यांच्या अंदाजे 31,000 ₹ किंमतीच्या डिस्कव्हर मोटारसायकल (क्र. एम.एच. 15- 6825) व हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल ( क्र. एम.एच. 15- 5947) अशा दोन मोटारसायकल दि. 10. ते  11  सप्टेंबरच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या होत्या. यावरुन मरिबा रंदिल यांनी   दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत अंबी पो.ठा. येथे गुन्हा क्र. 122/2022 हा नोंद आहे.

 तपासादरम्यान अंबी पो.ठा. च्या सपोनि- आशिष खांडेकर यांच्या पथकाने कौशल्यपुर्ण तपास करुन व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इनगोंदा येथील- शंकर रघुनाथ रणधीर, गुंडीराम बबन जाधव, किरण अरुण दणदिवे व आकाशे सुग्रीव सरवदे या चौघांना  ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील नमूद चोरीच्या दोन मोटारसायकल हस्तगत केल्या आहे. तसेच तपासादरम्यान अंबी  पो.ठा. येथे दाखल असलेल्या केबल चोरीच्या अन्य दोन गुन्ह्यात सांगवी ग्रामस्थ- सचिन भागवत गिरी व विठ्ठलवाडी ग्रामस्थ- समाधान कमलाकर गिरी या दोघांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून चोरीचे केबल हस्तगत केले आहे.

 सदरची कामगीरी   पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी व उप विभागीय पोलीस अधिकारी, भुम  दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबी पो.ठा. चे सपोनि  आशिष खांडेकर, पोहेकॉ- गजानन मुळे, पोकॉ  संदीप चौगुले, सतिश राऊत, बळीराम सोनटक्के यांच्या पथकाने केली असुन गुन्ह्याचा अधिक तपास पोहेकॉ  गजानन मुळे हे करत आहे. 

 
Top