उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथे सुरू होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास माता रमाई यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे. केंद्रीय मंत्री आठवले यांनी  तात्काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून मागणीची दखल घ्यावी असे पत्र पाठविले आहे. 

 उस्मानाबाद येथील शिष्टमंडळाने विशाल शिंगाडे यांच्या नेतृत्वात मंत्री आठवले यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. यावेळी सागर चव्हाण, सुगत सोनवणे उपस्थित होते. 

 उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आलेले आहे. सोलापूर येथील महाविद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने भीमनगर, उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला माता रमाई यांचे नाव देण्याची मागणी शिष्टमंडळाने निवेदनात केलेली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी तात्काळ यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल शिंगाडे यांनी आठवले यांचे आभार व्यक्त केले.


 
Top