उस्मानाबाद / प्रतिनिधी-

वसंत प्राथमिक जवाहर माध्यमिक आश्रम शाळा व जवाहर कनिष्ठ महाविद्यालय येथे  मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला .

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव   दयानंद मनोहर राठोड व कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्राचार्य  श्री जगताप बी . यु . तसेच जेष्ठ शिक्षक सुरवसे जी . एन .  देशमुख ए. आर . उंबरे यु के . व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते . 

मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . कार्यकमाचे प्रास्ताविक श्री  साकळे बी . एस . यांनी केले . याप्रसंगी ऑनलाईन तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल संस्थेच्या वतीने जवाहर माध्य. आश्रम शाळेचे मार्गदर्शक विज्ञान शिक्षक श्री जाधव एन.बी . व जवाहर कनिष्ठ महाविद्यालयाचे  प्रा. नवगीरे पी.पी. व सहभागी विद्यार्थीनी कु . जाधव प्रतिक्षा परमेश्वर हिचे सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या . आश्रमशाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांची भाषणे झाली . तसेच प्राचार्य जगताप बी . यू. यांनी अध्यक्षीय  समारोप करताना  मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मे यांच्या कार्याचा आढावा देत मार्गदर्शन करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या  . तसेच स्वच्छता ही सेवा या उपक्रमाची माहीती विद्यार्थ्यांना देऊन सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक राठोड व्ही. टी . यांनी मानले . कार्यक्रमास प्रशालेचे सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी बहुसंखेने उपस्थित होते . 

 
Top