उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील पाच बंगला  न्यायाधीश निवासस्थान परिसरातील १० हजारांची दोन चंदनाची झाडे  बुधवारी चोरून नेली होती.  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारधी पिढी, वरुडा (ता. उस्मानाबाद) येथील दादा संजय पवार व एक अल्पवयीन बालकाने झाडे  तोडल्याचे समजले. यावर पथकाने त्या दोघांना उस्मानाबाद ते तुळजापूर रस्त्यावर बेंबळी फाटा येथून शनिवारी ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली.

 सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पोनि- रामेश्वर खनाळ, सपोनि-  मनोज निलंगेकर, पोहेकॉ- प्रकाश औताडे, जावेद काझी, धनंजय कवडे, पोना- शौकत पठाण, पोकॉ- बलदेव ठाकुर, वैशाली सोनवणे यांच्या पथकाने केली आहे. 

 
Top