उस्मानाबाद / प्रतिनिधी-

बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचे नाव सकाळी उठल्याबरोबर घ्या आणि त्यांचे विचार अंगीकरून दिवसाची सुरुवात करावी,म्हणजे जीवनाला खरा अर्थ मिळेल, सुसंस्कृत राष्ट्र व पिढी फक्त शिक्षकच निर्माण करू शकतो, असे प्रतिपादन गोविंद नांदेडे यांनी केले.   अल्पसंख्याक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 18 व्या  वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी ते बोलत होते.

अल्पसंख्याक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक,आदर्श शाळा,व गुणवंत विध्यार्थी यांचा सत्कार समारंभ जि प कन्या प्रशाला उस्मानाबाद येथे आयोजित केला होता.  या प्रसंगी नवनियुक्त विस्तारअधिकारी ,मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण उपसंचालक गणपत मोरे, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे साहेब,डायट चे प्राचार्य दयानंद जेटनुरे ,शिक्षणाधिकारी अरविंद मोहरे,गट शिक्षण अधिकारी अरुणा कांबळे कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका दैवशाला हाके ,प्रदीप मोकशे आणि संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते . 

   यावेळी गणपत मोरे  ,दयानंद जेटनुरे  ,शिवाजी कपाळे  ,अरविंद मोहरे   यांनी शिक्षकाप्रति कृतज्ञता व्यक्त करून सर्व शिक्षकांचे कौतुक केले.  यावेळी जिल्ह्यातील बारा आदर्श शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,त्यात श्रीराम माळी,काळे गुणवंत,पाटील प्रशांत,चिनगुंडे सोमनाथ,क्षीरसागर हनुमंत,चव्हाण पल्लवी,भोसले बब्रुवान,यादव अंजली, शेख जकीयबेगम,शेख शबाना,खडबडे भास्कर,सय्यद अहमद,आदर्श शाळा म्हणून जि प के प्रा शा काक्रबा,जि प कन्या प्रा शा तडवळा,यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

 त्याच बरोबर गुणवंत विध्यार्थी म्हणून दंडनाईक सोहम,मुल्ला रिझा,शेख अफिफा,गायकवाड श्रुती,दंडनाईक ओंकार,बुकन आदिती,काळे मयुरी,शेख सालेहा,कांबळे वैष्णवी,बोडके आदित्य,मोमीन जवेरीया, काळे मानसी, मोमीन मुस्तकीन, चौरे गजानन,गायकवाड श्रेयश, घोडके उत्कृषा,बंडगर श्रीयश,चंदनशिवे प्रजोत,नारायनकर नंदिनी,नारायनकर संकेत यांचा सत्कार करण्यात आला

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक हाजी बशीर तांबोळी यांनी केले,तर सूत्रसंचालन विशाल सूर्यवंशी  यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेअरमन बशीर तांबोळी, व्हा चेअरमन मालोजी वाघमारे,सचिव बिलाल सौदागर, माहेबूब काझी सर ,नागनाथ बोडखे सर ,मुमताज शेख सर ,तय्याब शहा ,खमरुद्दीन सय्यद ,डी आर शेख ,इस्माईल शेख सर,जमिर पटेल, बागवान ईलाही, काळे मारुती,खिजर मोरवे,पठाण मुबारक,तांबोळी रहीम,शहेनवाझ औसेकर मॅडम,tabassumबागवान मॅडम, शहेडबी शेख मॅडम,आणि आमचे मित्र बोडके सरानी व व्यवस्थापक शेख यांनी परीश्रम घेतले


 
Top