कळंब  / प्रतिनिधी-

  येथील साईनगर हाऊसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सर्वसाधारण सभा दि. २४ रोजी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.  या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष म्हणून भागवतराव मोरे  हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर साई नगर हाऊसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे मुख्य प्रवर्तक संजय देवडा लेखापरीक्षक संतोष देवकर हे  या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात  दिवंगत झालेले तुकाराम शिंदे  यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.

 यावेळी सोसायटी मार्फत शिक्षणरत्न पुरस्कार प्राप्त सभासद बाबासाहेब कांबळे यांच्या सह सुरक्षा रक्षक भिमशा जमादार , प्रत्हाद पडेकर , अरुण चिंचकर  यांचा सोसायटीमार्फत सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना सोसायटीचे सचिव विलास मुळीक यांनी केली सर्वसाधारण सभेत अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.  या सर्वसाधारण सभेसाठी नामदेव सुतार , यशवंत हारकर, बाळासाहेब लोमटे, चंद्रकांत दशंवत   ,उद्धव गीते, जयपाल शिंदे, तुकाराम गरुडे  ,सचिन एरंडे, जे .एस . खोगरे , महारुद्र वाघचौरे,   गणेश डोंगरे ,बाबासाहेब कांबळे, शामराव कोयले, किशोर शिंदे , रवींद्र हरकर , सचिन चव्हाण ,सूर्यकांत वाघमारे , आमोल वाघचौरे आदी उपस्थित होते तर या सभेसाठी  प्रल्हाद पडेकर , अरुण चिंचकर  आदींनी परिश्रम घेतले.  तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पांडुरंग टेळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रशांत सलगरे  यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


 
Top