परंडा / प्रतिनिधी - 

तालुक्यातील भोंजा हवेली येथे “एक दिवस बळीराजा साठी उपक्रम”अंर्तगत कृषी विभाग शासकीय योजना विषयी सहाय्यक गट विकास अधिकारी रोहिदास राठोड व कृषी अधिकारी प्रशांत वास्ते यांनी शेतकऱ्यांच्या शेती विषयी अडीअडचणी समजून घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये शेत रस्ते, फळबाग लागवड, विहीर, विज कनेक्शन, मोटार इ ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतले नाही असे आव्हान करण्यात आले तसेच श्री पाटील बुवा जि प प्रोडुसर कंपनी लि भोंजा हवेली येथे सहाय्यक गट विकास अधिकारी श्री रोहिदास राठोड व कृषी अधिकारी प्रशांत वास्ते यांनी डायरेक्टर गणेशदादा नेटके व डायरेक्टर शशिकांत कुलकर्णी यांच्या सोबत चर्चा केली असता शेतकऱ्यांना पंचायत समिती चे जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना द्यावे असे मत डायरेक्टर गणेशदादा नेटके यांनी व्यक्त केले. 

यावेळी प्रगतशील बागायतदार माधवराव पाटील, माजी सरपंच राम नेटके, लक्ष्मण कोळी, सदस्य महादेव नेटके, विनायक नेटके, हनुमंत नेटके, मा सदस्य वसुदेव मदणे, बाबासाहेब मोरे, दादासाहेब पडदुणे, विलास नेटके, उद्योजक नवनाथ घाडगे, निखिल मोरे, दिलीप लोखंडे, राम काशीद इ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top