उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 “ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ घेत असलेल्या मात्र अद्याप ‘केवायसी e-KYC (ग्राहकाची ओळख) न केलेल्या शेतक-यांनी 31 ऑगस्ट, 2022 पर्यंत केवायसी ऑनलाईन करुन घेण्यासाठी मुदत देण्यात आलेली होती. परंतू ज्या शेतक-यांनी e-KYC पूर्ण केलेली नाही, अशा शेतक-यांना दि. 07 सप्टेंबर, 2022 पर्यत e-KYC करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. “

 तरी e-KYC (ग्राहकाची ओळख) न केलेल्या शेतक-यांनी दि. 07 सप्टेंबर, 2022 पर्यत e-KYC पूर्ण करुन घ्यावी. e-KYC पूर्ण केल्याशिवाय लाभार्थ्याना 12 वा हप्ता वितरीत होणार नाही, याची गंभीर दखल सर्व संबंधित शेतक-यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान ) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील फॉर्मर कॉर्नर (Farmer Corner) या टॅब मध्ये लाभार्थीना स्वतः केवायसी प्रमाणिकरण मोफत करता येईल. जिल्हयातील “महा ई-सेवा केंद्रावर” केवायसी बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल, याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्मामी यांनी केले आहे.


 
Top