उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा शल्य चिकित्यक रुग्णालय  येथे जिल्हा शासकीय महाविद्यालय मजुर झाले असुन जिल्हा शल्य चिकित्यक व जिल्हा शासकीय महाविद्यालयाची सुसज्ज अशी इमारत तयार असुन त्या इमारतीमध्ये इतर सर्व प्रकारच्या शासयकीय सुविधा दिल्या जातात . परंतु जिल्हा रुग्णालय स्थापन झाल्यापासुन वारंवार आपल्याला विविध संघटनेच्या माध्यमातुन निवेदने देवुन ही आज जिल्हाधिकारी कार्यालयात मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग ( MRI ) स्कॅनिंग मशीन सुरु केलेले नसुन उस्मानाबाद जिल्हाचे ठिकाण असुन तेथे संपूर्ण जिल्हयातून लोक येत असतात . या  MRI  स्कॅनिंग मशीन हे फक्त लातुर व सोलापुर येथे असुन नागरिकांना, पेशन्टंला तेथे घेवुन जाणे असहया होत असुन पेशन्टंच्या जिवीतास धोका होत आहे . सरकारी रुग्णालयातील डॉक्टर मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग ( MRI ) स्कॅनिंग करण्यासाठी खाजगी रुग्णालयाचे नाव सुचवतात तर खाजगी रुग्णालय पेशन्टंची अतिरीक्त पैसे घेवून लुट करीत आहेत .तरी जिल्हा रुग्णालयातील मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग ( MRI ) स्कॅनिंग मशीन लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री यांनी प्रशासनास द्यावे व मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग ( MRI ) स्कॅनिंग मशीन सुरु करुन सहकार्य करावे जर पुढील दहा दिवसात मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग ( MRI ) स्कॅनिंग मशीन सुरु न केल्यास  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसण्याचा इशारा मल्हार आर्मी यांच्या वतीने निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी बालाजी वगैरे मल्हार आर्मी जिल्हाध्यक्ष मराठवाडा अध्यक्ष अण्णा बंडगर ,विठ्ठल खटके जिल्हा कार्याध्यक्ष, समाधान पडुळकर जिल्हा उपाध्यक्ष, अशोक गाडेकर तालुका अध्यक्ष, महेश मोठे मल्हार आर्मी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष, एडवोकेट दशरथ कोळेकर संदीप वाघमोडे विनोद कुलकर्णी, दिलदार शेख व समाजातील प्रतिष्ठित  उपस्थित होते.


 
Top