उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात  अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने कौशल्य विकास व उद्योजकता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

सदर कार्यशाळा उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली .

    या एकदिवसीय कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून जिल्हा कौशल्य विकास आणि रोजगार केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री संजय गुरव, एनसीएस चे समन्वयक डॉ.अनिल जाधव आणि महात्मा गांधी नॅशनल फेलो भारत सरकार चे श्री मोहम्मद कपूर हे लाभले होते.याप्रसंगी सहाय्यक आयुक्त संजय गुरव म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिकत असतानाच स्वतःची कौशल्य विकसित करावी व रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करावा.    दुसरे साधन व्यक्ती म्हणून लाभलेले डॉक्टर अनिल जाधव म्हणाले की,एनसीएस मधून विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास साध्य करावा आणि कौशल्य विकासाच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा. यापुढे देखील महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी नामांकित कंपन्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाणार आहे असे ते म्हणाले. यादरम्यान मोहम्मद कपूर यांनी स्टार्टअप व उद्योजकता याबद्धल विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे होते. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख म्हणाले की, विद्यार्थ्यांना पदवी घेऊन महाविद्यालयाच्या बाहेर पडल्यानंतर कसलेही स्वरूपाची अडचणी येऊ नये. स्पर्धेमध्ये टिकून रहावेत यासाठी कौशल विकास कार्यशाळेसारखे अनेक कार्यक्रम महाविद्यालयात घेतले जातात. अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी प्रचंड प्रतिसाद देतात.

     या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. संदीप देशमुख यांनी केले, सूत्रसंचलन डॉ.नितीन गायकवाड यांनी केले तर आभार प्राध्यापक बालाजी नगरे यांनी मानले.    या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सदर कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.


 
Top