लोहारा/प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे जलपूजन दि.5 सप्टेंबर रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. 

माकणी निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. मागील चार दिवसापूर्वी धरणाचे चार दरवाजे उघडून पाण्याच विसर्ग करण्यात आला. यंदा धरणच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमानात वाढ होत असल्याने धरणाचे दरवाजे उघडले जात आहेत. सदर धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करताना धरणाखालील माकणी, सास्तूर, रेबेचिंचोली, एकोंडी लो, कवठा या गावांच्या नदीकाठच्या शेतीचे नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना आमदार चौगुले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच काल रात्रीच्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या अनेक शेतीचे नुकसान झाल्याने त्याचा स्वतंत्र पंचनामा करणेबाबतही तहसीलदार यांना सूचना केल्या. 

यावेळी ह.भ.प महेश महाराज कानेगावकर यांच्यासह लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, उपअभियंता नितीन पाटील, शिंदे गट शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, शिंदे गट लोहारा तालुकाप्रमुख जगन पाटील, शिंदे गट उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, बालेपीर शेख, अभिमान खराडे, परवेज तांबोळी, विनोद मुसांडे, चंद्रकांत मोरे, आप्पासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

 
Top