उमरगा/ प्रतिनिधी-

 नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी येथील तुळजाभवानी मित्र मंडळाच्यावतीने अंतुबळी सांस्कृतिक सभागृहासमोर सोमवारी( दि.२६) मोफत अन्नछत्राचा उपक्रम सुरू करण्यात आला. अन्नछत्राचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य संताजी चालुक्य, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे  माजी उपाध्यक्ष तथा अन्नछत्राचे प्रमुख कैलास शिंदे, अशोक जोशी महाराज, माजी नगरसेवक शरणप्पा घोडके, माजी नगरसेवक बाबूराव सगर यांच्या हस्ते करण्यात आले.

 तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक पायी जात असतात. आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्याची सिमा संपल्यानंतर महाराष्ट्र राज्याची सीमा सुरू होते. तुळजाभवानी माता दर्शनासाठी आंध्र व कर्नाटकातील हजारो भाविक या मार्गावरून प्रतिवर्षी पायी जातात. पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी शहरातील तुळजाभवानी मित्र मंडळाच्यावतीने गेल्या २२ वर्षापासुन मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले असून  या अन्नछत्रात फराळा बरोबरच जेवणाची उत्तम सोय मंडळाच्यावतीने केली जाते. नवरात्र उत्सव काळात लाखोंच्यावर भाविक येथील अन्नछत्राचा लाभ घेतात. सोमवारी झालेल्या कार्यक्रमाला शंतनु सगर, अशोक जोशी महाराज, गोपाळ घोडके, राजेश स्वामी,अनंत पाटील, मंगेश गायकवाड, कैलास स्वामी, संकेत नागणे, बसवराज घोडके, दिलीप माने, मल्लिणाथ कलशेट्टी, आदींची उपस्थिती होती.


 
Top