तुळजापूर/ प्रतिनिधी-

तालुक्यातील पिंपळाखुर्द येथील चर्मकार समाजाचे कु. महादेव सिताराम रोकडे यांची लंडन येथे  PHD च्या उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघ व शिवरत्न प्रतिष्ठान तामलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग म्हेत्रे व शिवरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्जेराव गायकवाड , सिद्धार्थ मुनेश्वर , सुधीर गायकवाड ,निरंजन करंडे, गणेश रोकडे, महेश रोकडे  व मित्र परिवार उपस्थित होते. 


 
Top