उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुखपदी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब, खासदार  डॉ.श्रीकांतजी शिंदे , महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत  , आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामहरी राऊत व सहकक्षप्रमुख ज्ञानेश्वर धुळगंडे यांनी दिले आहे. 

 या निवडीचे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.


 
Top