उस्मानाबाद / प्रतिनिधी-

एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रा.प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका या पदासाठी महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयामधील अटी व शर्तीनुसार भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

अंबेजवळगा विभागातील अंबेहोळ येथील अंगणवाडी क्रमांक 0128 मध्ये मिनी अंगणवाडी सेविकाचे एक पद, पोहनेर विभागातील चिलवडी येथील अंगणवाडी क्रमांक 0216 आणि 0217 मध्ये सेविकेचे प्रत्येकी एक पद, शेकापूर येथील अंगणवाडी क्रमांक 0231, 0232 आणि 0233 मध्ये मिनी अंगणवाडी सेविकेची तीन पदे, पिंपरी येथील अंगणवाडी क्रमांक 0234 मध्ये मिनी अंगवाडी सेविकेचे एक पद, गावसुद येथील अंगणवाडी क्रमांक 0235 मध्ये मिनी अंगणवाडी सेविकेचे एक पद, बेंबळी विभागातील बेंबळी येथील अंगणवाडी क्रमांक 0330 आणि 0331 मध्ये मिनी अंगणवाडी सेविकेची दोन पदे, देवळाली येथील अंगणवाडी क्रमांक 0328 मध्ये मिनी अंगणवाडी सेविकेचे एक पद, बरमगांव (बु.) येथील अंगणवाडी क्रमांक 0329 मध्ये मिनी अंगणवाडी सेविकेचे एक पद, केशेगाव विभागातील खामसवाडी येथील अंगणवाडी क्रमांक 0426 मध्ये मिनी अंगणवाडी सेविकेचे एक पद, वाडी बामणी येथील अंगणवाडी क्रमांक 0427 मध्ये मिनी अंगणवाडी सेविकेचे एक पद, पाडोळी विभागातील घुगी येथील अंगणवाडी क्रमांक 0629 मध्ये मिनी अंगणवाडी सेविकेचे एक पद, समुद्रवाणी विभागातील सांगवी येथील अंगणवाडी क्रमांक 0705 मध्ये सेविकेचे एक पद आणि सांजा येथील अंगणवाडी क्रमांक 0733, 0734 आणि 0735 मध्ये मिनी अंगणवाडी सेविकेचे तीन पदे आदीं पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या भरती प्रक्रियेत नमूद करण्यात आलेल्या गावांमध्ये नमूद केलेल्या पदासाठीचे आवेदनपत्र दि.12 ते 23 सप्टेंबर 2022 पर्यंत या कालावधीत अर्ज प्रकल्प कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) स्वीकारले जाणार आहेत. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या भरती प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे यांनी केले आहे.


 
Top