तुळजापूर/प्रतिनिधी

 येथील श्री  तुळजाभवानी महाविद्यालयास प्रदिर्घ कालावधी नंतर नॅक पुनर्मूल्यांकन प्रक्रियेमध्ये अ दर्जा प्राप्त झाला आहे.

अ दर्जा चे  यश महाविद्यालयाच्या भविष्य कालीन शैक्षणिक वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, मूल्यांकन समिती 6 व 7 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये महाविद्यालयात आली होती, मागील पाच वर्षांपासून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या कुशल नेतृत्वाखाली प्रत्येक विभागाने अतिशय गंभीरपणे व सुनियोजित पद्धतीने आप आपल्या विभागाची तयारी केली होती, विशेष म्हणजे विज्ञान शाखा महाविद्यालयात नसतानाही 407 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारे झालेली नेमणूक, तसेच सांस्कृतिक विभागातर्फे युवक महोत्सवात प्राप्त झालेली चॅम्पियन ट्रॉफी,एन सी सी व एन एस एस चे प्रभावीपणे केलेले सामाजिक कार्य, तसेच मागील पाच वर्षांपासून महाविद्यालयात संपन्न झालेले विविध विभागांचे राष्ट्रीय सेमिनार,माजी व आजी विद्यार्थ्यांशी झालेला वैचारिक संवाद, विभागवार घेतले गेलेले विविध कोर्सेस, महिला सक्षमीकरण विभागाचे स्वयंरोजगाराच्या दृष्टीने घेतले गेलेले प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थीनींसाठी उपलब्ध करून दिलेल्या विविध भौतिक सुविधा, महाविद्यालयाची गुणवत्ता आदी सर्व बाबी महत्त्वाच्या ठरल्या, कौतुकास्पद बाब म्हणजे कनिष्ठ विभागातील शिक्षकांचे मिळालेले अभूतपूर्व सहकार्य तसेच महाविद्यालयीन विकास समितीचे मिळालेले अनमोल मार्गदर्शन हे सर्व घटक आणि त्यांचे  मिळालेले सकारात्मक सहकार्य या सर्व बाबींवर हे उत्तम यश मिहाविद्यालयास प्राप्त होऊ शकले.

 महाविद्यालयास प्राप्त झालेल्या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सचिवा शुभांगीताई गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी तसेच महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य अशोकभाऊ मगर, डॉ.वडगावकर,सज्जनराव साळुंके, डॉ.सुयोग अमृतराव, डॉ.आनंद मुळे, महेंद्र कावरे सर तसेच पालक वर्ग व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख यांनी प्राचार्य डॉ एस एम मणेर यांचे अभिनंदन केले,तर यापुढे महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांची जबाबदारी वाढल्याची प्रतिक्रिया यावेळी प्राचार्य डॉ एस एम मणेर यांनी दिली, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या हस्ते प्राचार्य डॉ एस एम मणेर यांचा सत्कार करण्यात आला, तसेच नॅक विभाग प्रमुख मेजर डॉ.वाय.डोके यांच्या सह यावेळी कोल्हे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.


 
Top