उस्मानाबाद / प्रतिनिधी-

माजी पर्यावरण मंत्री व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात उभा राहणारा वेदांत व फॉक्सकॉन कंपनीचा संयुक्त भागीदारी असलेला १.४५ लाख कोटींचा महाराष्ट्राच्या १ लाख तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प पुणे येथील तळेगाव मध्ये होणार होता. तो आता महाराष्ट्रातून शिंदे-फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातला सुरू करण्यात आला आहे. याचा निषेध म्हणून युवा निषेध स्वाक्षरी मोहिम शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयासमोर युवासेना व शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. 

यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख व विभागीय सचिव अक्षय ढोबळे, जिल्हा उपप्रमुख निलेश शिंदे, युवती जिल्हा उपप्रमुख ऍड. भाग्यश्री रणखांब, तालुका उपप्रमुख राकेश सुर्यवंशी, माजी नगरसेवक राणा बनसोडे, दिनेश दत्ता बंडगर, शहर उपप्रमुख मनोज उंबरे, राकेश कचरे, अमित उंबरे, सुधीर अलकुंटे, रवी वडणे, बाळकृष्ण साळुंखे, संदीप गायकवाड, अनिल सुतार, केदार हिबारे, प्रवीण केसकर, रोहित कदम, राजेश कोळी, यश कोळी, रितेश गायकवाड, प्रेम माळी, सागर अलकुंटे, सुशील जाधव, प्रसाद शिंदे, आकाश जाधव, निलेश यमपुरे आदी उपस्थित होते. या निषेध स्वाक्षरी मोहिमेत विद्यार्थी-विद्यार्थीनी व नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

 
Top