उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्तीस नारी शक्ती पुरस्कार दिला जातो. सन 2022 या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक व पात्र अर्जदारानी www.wed.nic.in या संकेतस्थळावरील मार्गदर्शक सुचनानुसार दि.31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत www.awards.gov.in या वेबसाईट च्या लिंकवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कक्ष क्रं.10  येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन प्र. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  एस.बी.शेळके यांनी केले आहे.

 
Top