उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अनुकंपा धारक उमेदवारांना नियुक्ती देण्याचे प्रस्तावित असल्याने उमेदवारांची जेष्ठता यादी जिल्हा परिषद उस्मानाबाद च्या www.zposmanabad.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी  ०१ ते ८० पर्यंतचे उमेदवारांना  भरती आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दि. ०७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हा परिषदेच्या व्हिडीओ कॉन्फरंस हॉल, शिक्षण विभाग प्राथमिक शेजारी तळ मजला,  येथे कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे.

 उमेदवारांनी जि.प.उस्मानाबादच्या संकेत स्थळावरील जेष्ठता यादीचे अवलोकन करुन मूळ कागदपत्रांसह  वेळेवर उपस्थित राहावे  मुळ कागदपत्रे सादर केलेले असल्यास त्यांच्या सत्यप्रतिसह उपस्थित राहावे. या दिवशी आपण उपस्थित न राहिल्यास अनुकंपा नियुक्तीचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, तसेच आपण अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज केलेल्या पत्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी पत्रव्यवहार रजिस्टर पोष्टाने केलेला आहे. तरी आपण दिलेल्या पत्यावरुन पत्र प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, राहुल गुप्ता  यांनी केले आहे.


 
Top