तुलजापूर/ प्रतिनिधी-

तुळजाभवानी मंदिर परिसर आणि तुळजापूर शहरात बाल संरक्षण समितीच्या वतीने बाल भिक्षेकांवर कारवाई करण्यात आली. तुळजाभवानी मंदिर परिसरात एकूण 20 अल्पवयीन मुले भीक मागताना प्रशासनाच्या पथकाला आढळून आले. त्यात 16 मुले आणि 4 मुली यांना ताब्यात घेतले. या मोहिमेत तालुका शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन, नगर परिषद प्रशासन, तहसील प्रशासन, बाल संरक्षण समिती,चाईल्ड लाईन आदी विभागाचे 60 अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

तुळजाभवानी मंदिरासमोर गेल्या अनेक वर्षापासून बाहेर जाऊन दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आडवून करून मुले भीक मागतात. या विरोधात तुळजापूर येथील समाजसेवक संजयकुमार बोंदर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून या प्रश्नाबाबत आवाज उठवला होता.

दरम्यान, मंदिराच्या वेगवेगळ्या मार्गावर 60 अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले. त्यानंतर लहान मुलांना भीक मागत असताना रंगेहात पकडण्यात आले. या सर्वांना पुढील कारवायासाठी ताब्यात घेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली.


 
Top