उस्मानाबाद / प्रतिनिधी-

   उस्मानाबाद, दि.01 (जिमाका) : उस्मानाबाद जिल्हयातील उस्मानाबाद तालुक्यातील तुगांव व समर्थ नगर भुम ता. भुम जि.उस्मानाबाद येथील होणारा बालविवाह थांबविण्यात महिला व बाल विकास विभागाला यश मिळाले आहे.

 दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी अल्पवयीन बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.बी. शेळके यांना मिळाली श्री.शेळके यांच्या मार्गदर्शनावरुन उस्मानाबाद तालुक्यातील तुगांव  येथे होणा-या बालविवाह थांबविण्यासाठी  येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी राठोड, ग्रामसेवक  एस. एल. लोमटे तलाठी श्रीमती दिपा मुळुक पोलिस पाटीत श्रीमती हाजगुडे आणि अंगणवाडी सेविका  पुजा कोळी यांना जिल्हा बाल संरक्षण अधिकारी  व्ही. एन. देवकर यांनी बालविवाह बाबतची माहिती दिली. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी  प्रज्ञा बनसोडे आणि  हर्षवर्धन सेलमोहकर यांना बालविवाह थांबविण्यासाठी सांगण्यात आले त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचा-यांनी संबंधित गावचे सरपंच, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तलाठी यांनी तात्काळ बालविवाह थांबविला.

 भूम तालुक्यातील समर्थ नगर येथील बालविवाह रोखण्यासाठी तालुका संरक्षण अधिकारी  दिनेश घुगे पोलिस निरीक्षक दतात्रय सुरवसे, पोलिस बिट अंमलदार  एस. आय. शेख, तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी  प्रज्ञा बनसोडे आणि हर्षवर्धन सेलमोहकर यांनी येथील हजर असलेलेल्यांना बाल विवाह अधिनियम 2006 कलम 10 व कलम 11 नुसार कायद्याचे उल्लधंन केल्यास 2 वर्षे सक्षम कारावास व 1 लाख रु. दंड आणि हा अपराध अजामिन पात्र गुन्हा आहे याची वधु वराच्या आई वडीलास व गावातील रहिवांशाना समजुत देण्यात आली आणि अल्पवयीन बालिकेस बालकल्याण समिती समोर हजर करण्यात आले.


 
Top