उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत  जिल्हयातील 55 गावांत अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे.

 या योजनेअंतर्गत अंमलबजावणी टप्पातील मागणी आधारित (पाणी बचतीच्या उपाययोजना) कामे व पुरवठा आधारित (जलसंधारण पुनर्भरण उपाययोजना) कामे करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने दि. 24 ऑगस्ट 2022 रोजी मौजे. जागजी ता.जि. उस्मानाबाद येथे रिजार्च शाफट कामाचा शुभारंभ  लक्ष्मण बनसोडे सरपंच मौजे. जागजी यांच्या हस्ते करण्यात आला. हे काम 55 गावांत करण्यात येणार आहे. यामुळे भूजलाची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार असल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक  एस. बी. गायकवाड यांनी सांगितले. यावेळी सरपंच  लक्ष्मण बनसोडे, ग्रामविकास अधिकारी  एस.एन. शिंदे, कचरु हिंगे, मारुती लहाडे शेतकरी, डॉ. मेघा शिंदे सहा. भूवैज्ञानिक, आर. बी. शेटे कनिष्ठ भूवैज्ञानिक,  ब्रम्हदेव माने IEC तज्ञ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा  व ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top