कळंब / प्रतिनिधी-

 पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी कुपोषण मुक्त भारत करण्याच्या संकल्पनेतून महत्त्वाकांक्षी आणि प्राधान्याचा हाती घेतलेला कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय पोषण अभियान या पोषण अभियानांतर्गत सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महा म्हणून  साजरा करण्यात असून  आयुक्त तथा राज्य प्रकल्प संचालक एकात्मिक बाल विकास सेवा योजना, मुंबई यांचे मार्फत विविध  उपक्रमांचे केलेल्या नियोजनानुसार  एकात्मिक बाल विकास सेवा योजना, ग्रामीण प्रकल्प कळंब तालुका कळंब जिल्हा उस्मानाबादच्या येरमाळा विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीमती बोरफळकर ए. बी. आणि शेलगाव(दि)येथील अंगणवाडी सेविका सुशीला चंदनशिवे व प्रभावती दिवाणे मदतनीस सीमा चंदनशिवे,सुरेखा पवार यांनी अंगणवाडी क्रमांक   येथे स्थानिक बालके,किशोरी,गर्भवती माता,महिला यांच्यातील कुपोषण दूर होऊन योग्य पोषण होण्यासाठी जनजागृती साठी रांगोळी स्पर्धा,पोषक आहार युक्त

पाक स्पर्धा,सुदृढ बालक स्पर्धा  घेण्यात आल्या, या स्पर्धांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक स्नेहल बालाजी दिवाणे, द्वितीय क्रमांक सृष्टी जयराम दिवाणे तृतीय क्रमांक अश्विनी अंकुश भात लवंडे विजयी झाले असूनसुदृढ बालक म्हणून कुमारी अनुष्का जयराम भातलवंडे (वय सहा महिने वजन सात किलो)

 असून या स्पर्धांची सुरुवात होण्या आधी गावातील पोषण वाटिकांची पाहणी करून गावातून पोषण रॅली काढण्यात आली होती. या पोषण कार्यक्रमामुळे ग्रामस्थां मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून  घरोघरी पोषण वाटीका तयार करण्याचे पर्यवेक्षिका श्रीमती बोरफळकर ए.बी.यांनी

 ग्रामस्थांची बैठक घेवून आवाहन केले आहे.

 
Top