उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

जिल्हयासह राज्यात सहकार क्षेत्रातील अनेक संस्था बुडाल्या परंतू उस्मानाबाद जिल्हयातील  लोकांच्या विश्वासामुळे उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने ९० व्या. वर्षांत पदार्पण केले, असे मत बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांनी पु.वि.लोकराज्यशी बोलताना व्यक्त केले.

उस्मानाबाद जनता सहकारी बँक स्थापन झाल्यानंतर कांही वर्षांनी आम्ही कर्मचारी म्हणून येथे कामाला सुरुवात केली होती.  लागल्यानंतर आम्ही सर्व कर्मचारी व बँकेच्या संचालक मंडळाने झोकून देऊन काम केले.बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करीत असताना कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडलो नाही, प्रत्येक क्षेत्रात बँकेचे हित पाहूनच निर्णय घेतले गेले. िजल्हयातील लोकांनी आमच्यावर १०० टक्के विश्वास टाकला. त्यामुळेच उस्मानाबाद जनता बँक ९० व्या वर्षांत पदार्पण करीत असल्याची प्रतिक्रिया वसंतराव नागदे यांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना दिली. 

 
Top