उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

डि.व्ही.पी. उद्योग समुह धाराशिव साखर कारखाना लि., चोराखळी युनिट क्र. १ या कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२२-२३ चा १० वा रोलर पुजन कार्यक्रम  कारखान्याचे संचालक रणजित भोसले,   भागवत चौगुले,  सुरेश सावंत,  सुहास शिंदे यांचे शुभहस्ते संपन्न झाला.

 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  सुनिल पाटील होते. तसेच कारखान्याचे श्री. तांबारे विक्रम, श्री. बोबडे प्रविण, श्री. कोळगे ज्ञानेश्वर, वैभव देशमुख, बाबासाहेब वाडेकर, श्री. बाळासाहेब पेठे, श्री. सुनिल लोमटे कारखाना भागातील शेतकरी, वाहतुक ठेकेदार व कारखान्यातील कर्मचारी व कामगार यांचे उपस्थितीत पार पडला.

यावेळी   चेअरमन   अभिजीत धनंजय पाटील यांच्या सुचनेप्रमाणे कारखान्याचे संचालक मा. श्री. सुहास शिंदे यांनी हंगाम २०२१-२२ ऊस बिलाचा दुसरा हप्ता रक्कम रु १५०/ प्रमाणे दिनांक १०/०९/२०२२ पासुन दि. पिपल्स मल्टीस्टेट मध्ये शेतक-यांच्या खाती वर्ग करण्यात येईल असे जाहीर केले. तसेच हंगाम २०२२-२३ साठी तोडणी वाहतुक करार पुर्ण झाले असुन त्याचा पहिला हप्ता वाटप करण्यात आला तसेच ऊसाची नोंदी व कारखाना देखभाल दुरुस्तीचे कामे अंतिम टप्यात असुन कारखाना लवकरात लवकर चालु करण्याचे जाहीर केले.

 
Top