उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील बेंबळी येथे दक्षता फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धेतील विजेत्यांना शुक्रवारी पारितोषिकांचे वाटप करण्यात आले.

 बैलपोळ्यानिमित्त दक्षता फाउंडेशनने आयोजित आलेल्या बेंबळीतील उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये रामकृष्ण पवार यांची बैलजोडी प्रथम, नानासाहेब कामतकर यांची द्वितीय, श्रीमंत पवार यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक पटकावला. यांना अनुक्रमे आकाश कसबे, जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे श्रीकृष्ण खापरे, विद्यार्थी मालोजीराजे रणजित बरडे यांच्या वतीने पारितोषिक देण्यात आले. तसे उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावणारी किरण सोनटक्के यांच्या बैलजोडीला विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक अॅड. शिरिष गिरवलकर, गोरोबा घोडके यांना बालविकास गणेश मंडळ, राजाभाऊ इंगळे यांना शिवसेनेेचे दादा पाटील, हरिभाऊ सांगवे यांना नितिन खापरे, गणपत सोनटक्के यांच्या वतीने पारितोषिक देण्यात आले.

 पारितोषिकांचे वितरण सहाय्यक पोलिस निरिक्षक मच्छींद्र शेंडगे, उपसरपंच नितिन इंगळे, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ नळेगावकर, माजी उपसरपंच बाळासाहेब माने, हाशमोद्दीन शेरीकर, दिनेश हेड्डा, बिभिषण माने, स्पर्धेचे परिक्षण करणारे गोविंद शिडोळे, गणपत सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमर कटके यांनी केले. दक्षता फाउंडेशनचे अध्यक्ष गालिब पठाण, उपाध्यक्ष नितिन खापरे, सचिव शामसुंदर पाटील, सहसचिव गुड्डू सोनटक्के, कोषाध्यक्ष सुनिल वेदपाठक, स्पर्धेचे संकल्पक रणजित बरडे, विश्वस्थ गोविंद पाटील, आतिक सय्यद, नंदकुमार मनाळे, रोहीत निकम ,बालाजी माने, सपोश गिरवलकर, उपस्थित होते. 

 
Top