उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील वडगांवकर परिवाराच्या वतीने गेली ७वर्षा पासुन अखंडीतपणे स्वखर्चाने श्रीगणेश विसर्जन दिनी भक्तांची गैरसोय होऊ नये याकरिता महाप्रसादाचे आयोजन करतात. यासाठी वडगांवकर परिवारातील रमेश वडगांवकर, महेश वडगांवकर, शरद वडगांवकर, डॉ. विशाल वडगांवकर,सौ. मीरा वडगांवकर, सौ. मधुरा वडगांवकर , डॉ. रेणुका वडगांवकर,चि.शेखर, आदित्य वडगांवकर,कु. वैष्णवी तसेच सर्व वडगांवकर परिवार सदस्य आचरेकर परिवार भगिनी भोजन व्यवस्था व्यवसायिक प्रतिवर्षी आवर्जून हैद्राबादहून सेवार्थ भावनेने या उपक्रमात सौ. इंदूताई श्रीकांत दिक्षीत परिश्रम घेतात. या वडगांव कर परिवाराच्या उपक्रमासाठी स्वंय सेवक म्हणून जिल्हा संस्कार भारती चे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, मार्गदर्शक शेषनाथ वाघ, मेलडी स्टार समुहाचे प्रवर्तक युवराज नळे ,धनंजय कुलकर्णी, राधेश्याम बजाज व त्यांचे कर्मचारी त्याच बरोबर व्यापारी संघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांनी महाप्रसाद वाटपास मदत केली असंख्य गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला

 
Top