तुळजापूर/ प्रतिनिधी-

 शारदीय नवरात्र महोत्सवात आज श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज दुसरी माळ. तत्पूर्वी पहाटे 6 ते सकाळी 10 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.   श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार पूजेस दि. 29 सप्टेंबर  पासून सुरुवात होत आहे. यात, दि.29 सप्टेंबर रोजी रथ अलंकार महापूजा, दि. 30 सप्टेंबर रोजी ललीत पंचमी निमित्त मुरली अलंकार महापूजा, दि.01 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, दि. 02 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि.3 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.

 तत्पूर्वी, काल (सोमवार ) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक नंदी वाहनातून काढण्यात आली.


 
Top