लोहारा/प्रतिनिधी

अष्टविनायक गणेश मंडळ लोहारा यांच्या वतीने शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात दि.4 सप्टेंबर 2022 रोजी विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

विद्यार्थ्यांच्या अभ्यासात भर पडावी व शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी या उद्देशाने अष्टविनायक गणेश मंडळाच्यावतीने तालुका स्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. या परिक्षा स्पर्धेत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा, यांच्यासह संस्थेतील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या जवळपास दिड हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी गटशिक्षणाधिकारी भास्कर बेशकराव, अभिमान खराडे, जगदीश लांडगे, ओम कोरे, अदि, उपस्थित होते. या स्पर्धेतील मोठा गटातील प्रथम क्रं. विद्यार्थ्यांला नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्यावतीने 7001, द्वितीय क्रं.विद्यार्थ्यांला नगरसेविका आरती गिरी यांच्यावतीने 5001, तर तृतीय क्रं विद्यार्थ्यांला लक्ष्मण बोडगे यांच्या स्मरणार्थ 3501 व चतुर्थ क्रं. विद्यार्थ्यांला सुरेश वाघमोडे यांच्यावतीने 2001 तर लहान गटांमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला नगरसेवक हाजी आमिन सुंबेकर यांच्या वतीने 555,  द्वितीय क्रं. विद्यार्थ्यांला उपनगराध्यक्ष आयुब शेख यांच्या वतीने 3501 तर तृतीय क्रं.विद्यार्थ्यांला शिवसेना गटनेत्या सारिका प्रमोद बंगले यांच्यावतीने 2501 तर चतुर्थ क्रं विद्यार्थ्यांला शिवम कृषी सेवा केंद्र लोहारा यांच्या वतीने  बक्षिस पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अष्टविनायक गणेश मंडळाचे अमित बोराळे, अजित विभुते, बळी रणशूर, आकाश कुरकुले, संतोष गिरी, मनोज बादुले, रमेश काटगावे, दत्ता रोडगे, गणेश विभुते, अंगद बंडगर, राहुल बेलकुणीकर, विजय स्वामी, अदिंनी परिश्रम घेतले. अष्टविनायक गणेश मंडळाने स्तुत्य उपक्रम राबविल्याने पालकातून समाधान व्यक्त केले जात आहे.


 
Top