उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सव जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात येणार आहे, त्याचे नियोजन करण्यासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक  बुबासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे बैठक संपन्न झाली.

 यामध्ये उपस्थित जिल्ह्यातील प्रतिष्ठीतांनी अनेक संकल्पना मांडल्या, व अमृत महोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने मोठ्या दिमाखात साजरा करण्याचा निर्णय झाला. सदरील बैठकीमध्ये शोभायात्रा, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार, व्याख्यान, चित्रफीत प्रदर्शन, हुतात्मा स्मारकाची स्वच्छता व हुतात्म्यांना अभिवादन असे विविध कार्यक्रम आयोजित कारण्याचे ठरले आहे.  या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमीत्ताने आयोजित करण्यात येत असलेल्या शोभा यात्रेमध्ये व कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही सुचना कल्पणा असतील तर युवराज नळे यांच्याकडे सुचित करण्यात यावे.

 सदरील बैठकीस नितिन काळे, सुरेश भाऊ देशमुख, दत्तात्रय कुलकर्णी,  राजसिंहा राजेनिंबाळकर, खंडेराव चौरे, नेताजी पाटील, सतीश दंडनाईक, इंद्रजित देवकाते, युवराज नळे, विनोद गपाट, अभय इंगळे, राहुल काकडे, नाना धत्तुरे, मोहन मुंडे, खंडू राऊत, वैभव हंचाटे, ओम नाईकवाडी, प्रितम मुंडे, सचिन तावडे, प्रकाश तावडे, अमोल राजेनिंबाळकर, अमोल पेठे, हिम्मत भोसले, उदय देशमुख, नरेन वाघमारे, राज निकम, जाधवर सर, यांच्यासह बहुसंख्येने  विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


 
Top