उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उमरगा तालुक्यातील काळा निंबाळा येथे शासनाने संपादित केलेल्या व त्या जागेवर राहत असलेल्या नागरिकांना अद्यापपर्यंत ग्रामपंचायतने त्यांच्या नोंदी केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. ग्रामपंचायतने त्या नोंदी घ्याव्यात या मागणीसाठी फकीरा ब्रिगेडच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.१ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात आले.

उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे शासकीय जमिनीवर अनेक लोक कब्जा करून राहत आहेत. त्याची ग्रामपंचायतीने नोंद केलेली नसल्यामुळे त्यांना सर्वे करून त्यांच्या नावे ८ अ देण्यात यावा.  ग्रामपंचायत गट विकास अधिकारी यांनी भूकंपग्रस्तांची घरे सोडून इतर किती लोकांच्या नावे ८ आ केलेले आहेत. त्याची चौकशी करण्यात यावी व त्यांच्या प्रमाणेच आमची नावे घेण्यात यावीत. याबाबत गटविकास अधिकारी यांना वारंवार निवेदनाद्वारे मागणी केली. मात्र अद्यापपर्यंत कुठलीच कार्यवाही केलेली नाही. यावेळी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण खंडाळे, संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीचे महेश गोरे, मराठवाडा अध्यक्ष श्रीरंग सरवदे, महिला जिल्हाध्यक्ष पार्वती झुंजारे, जिल्हा उपाध्यक्ष नागिनी थोरात आदीसह इतर उपस्थित होते.


 
Top