उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

   कुसगाव,( ता. मावळ), जिल्हा पुणे येथील दोन अल्पवयीन मुली या नेहमीप्रपमाणे   शाळेत गेल्या असता त्या घरी लवकर न परतल्याने त्या दोघींच्या कुटूंबीयांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा क्र. 160 /2022 हा भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत नोंदवला. यावर लोणावळा पोलीसांनी त्या दोघींचा शोध घेण्यास सुरुवात केली असता त्या दोघी पनवेल- नांदेड या रेल्वेने नांदेडकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्या बेपत्ता मुलींची माहिती लोणावळा पोलीसांनी उस्मानाबाद पोलीसांना कळवली. यावर घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. चे पोनि- श्री. साबळे, आनंदनगर पो.ठा. चे सपोनि- श्री. चैनसिंग गुसिंगे, पोलीस अंमलदार- पांडुरंग बोचरे, राजु थोरात, परविन सय्यद यांचे संयुक्त पथक उस्मानाबाद रेल्वे स्थानक येथे रवाना झाले. नमूद रेल्वे ही उस्मानाबाद रेल्वे स्थानकावर येताच त्या दोन्ही मुलींचा शोध घेउन   मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या दोन्ही मुलींना ताब्यात घेतले. पोलीसांनी त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी वैष्णवी सुभाष जाधव, वय 12 वर्षे व मीनाक्षी सुभाष जाधव, वय 13 वर्षे, रा. दोघी रा. कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे असे सांगीतले. यावर उस्मानाबाद पोलीसांनी लोणावळा पोलीसांशी संपर्क करुन त्या मुली ताब्यात घेतल्या असुन त्या सुखरुप असल्याचे कळवीले.   त्या दोन्ही मुलींना लोणावळा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

   अशा प्रकारे लोणावळा पोलीस व उस्मानाबाद पोलीस यांच्या सतर्कतेने लोणावळा येथून बेपत्ता दोन मुलींचा अवघ्या चार तासात शोध घेण्यास पोलीसांना यश आले.

 
Top