तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील माळुंब्रा येथील जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेत चार वर्गास अवघे दोन शिक्षक  अध्ययनाचे काम करीत असल्याने येथे िवद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पटसंखे नुसार आणखी दोन शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी ग्रामस्थांन मधुन केली जात आहे 

  याबाबतीत अधिक माहिती अशी की , माळुंब्रा (ता. तुळजापूर) येथे जिल्हा परिषदची  पहिली ते चौथी पर्यत प्राथमिक शाळा असुन येथे  पंचक्रोषीतील शेतकरी  मजुरांचे  ९१ विद्यार्थी  शिक्षण घेत आहेत. पटसंख्ये नुसार पंचवीस विद्यार्थ्यांना एक शिक्षक असे चार शिक्षकांची येथे गरज असताना येथे तीन शिक्षक अध्ययनासाठी होते. त्यातील एक शिक्षकाचे  निधन झाल्याने येथे  तीन महिन्या पासुन  अवघे दोन शिक्षक सध्या कार्यरत आहे.    येथे अशीच परिस्थिती राहिली तर यांचा शैक्षणिक पाया कच्चा राहुन यांचे भवितव्य अंधकार होणार आहे या प्रकारामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.या  िवद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी तातडीने आणखी दोन शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.


 
Top