परंडा /प्रतिनिधी -

परंडा येथील जि.प.कन्या.प्राथमिक शाळा आदर्श उपक्रमशील शिक्षिका उत्तम कवयित्री नेहमी विद्यार्थी यांच्या हितासाठी प्राधान्य देणा-या श्रीमती पल्लवी चव्हाण शिक्षीका यांना अल्पसंख्याक सोसायटी उस्मानाबादच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार श्री.गोविंद नांदेडे शिक्षण सहसंचालक यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

     यावेळी लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे , उस्मानाबाद जिल्हा शिक्षणाधिकारी डाॅ.अरविंद मोहिरे , डाएटचे प्रचार्य दयानंद जटनूरे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपाळे,मल्हारी माने ,बशीरभाई तांबोळी सर,कल्याण बापु बेताळे, विलासराव कंटेकूरे सर,विक्रम भैय्या पाटील, रमेश बारसकर, बाळासाहेब वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.शिक्षका पल्लवी चव्हाण यांच्या पुरस्कार प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

     यावेळी रामदास होरे सर,युवराज खाडे जिल्हा उपध्यक्ष शिक्षक समिती  नागनाथ देशमुख ता अध्यक्ष, मा.अंकुश गवळी सर,  महादेव विटकर केंद्र प्रमुख, संजय मुसळे सर केंद्र प्रमुख ढेकणे मारुती मुख्याध्यापक सौ.संजीवनी पाटील मॅडम, सौ.शांता ठाकुर मॅडम,राणी भांडवलकर ,धनराज सुतार सर, आनंद गायकवाड सर, जयराम शिंदे सर, महादेव गाडे आदि उपस्थित होते.


 
Top