परंडा /प्रतिनिधी -

 परंडा तालुक्यातील अनाळा येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने नवरात्र महोत्सवात माता सुरक्षित तर घर सुरक्षित शिबीराचा शुभारंभ दि.२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आला . प्रारंभी राजमाता जिजाऊ च्या प्रतिमेचे पुजन सरपंच सौ. अंबिका जोतीराम क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.आरोग्य विभागाच्या वतीने २६ सप्टेबर ते ०५ ऑक्टोंबर या दरम्यान माता सुरक्षित तर घर सुरक्षित शिबीर राबविण्यात येणार आहे.या शिबीरा दरम्यान आरोग्य विभागाच्या वतीने महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे .

घरातील महिला हीच घरातील सर्व व्यक्ती ची देखभाल करते परंतू स्वतः च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत सर्व कुटुंबातील व्यक्ती ची काळजी घेते . यामुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून माता सुरक्षित तर घर सुरक्षित शिबीर राबविण्यात येणार आहे .

या शिबीरात महिलांच्या सर्व आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत . माता सुरक्षित तर घर सुरक्षित शिबीर दरम्यान महिलानी आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी अमृता भांडवलकर यांनी केले आहे . कार्यक्रमास ग्रा.प. सदस्या सुनिता शिंदे , अर्चना कदम , स्वाती चव्हाण आरोग्य केंद्राच्या परिचारिका सुनिता लष्कर , पी. ए. पारडे , औषध निर्माता व्हि . एस. आटुळे , आरोग्य सेवक भिवा चव्हाण , शिवराज जाधव, उदय फंड , नेत्रचिकित्सक नम्रता काशिद , स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या तालुका समन्वयक नौशाद शेख , लॅब टेक्निशियन शेख , आरोग्य केंद्राचे परिचर आर. एम .ओहाळ , अंगणवाडी सेविका हसीना शेख , वंदना मोरे , आशा सेविका अनिता क्षिरसागर , जयश्री हिवरे प्रेरिका रेणुका सुर्वे यांच्या सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार अमृता भांडवलकर यांनी केले.


 
Top