तुळजापूर / प्रतिनिधी-
तिर्थक्षेञ तुळजापूरात महालक्ष्मी समोर विविध प्रकारचे स्थिर हलते देखावे घरोघरी करण्याचे प्रमाण वाढले असुन यात सौ. पल्लवी व सचिन रोचकरी यांनी ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव सोहळा व पुनम कुमार जाधव यांनी महाराष्ट्राची पारंपरिक ग्रामीण संस्कृती दर्शन घडविणारा देखावे शहर वासियांचे आकर्षण ठरले आहे.
या दोन महिलांनी कुंटुंबाचा मदतीने हे देखावे साकारले आहेत. हा देखावा पाहण्यासाठी हिंदू बरोबरच मुस्लीम महिलांनी मोठी गर्दी केली होती.
सौ पूनम व कुमार जाधव या दांपत्याने आपल्या घरातील गौरी गणपती समोर महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृतीचे घडविणारा देखावा सादर केला आहे लोप पावत चालेली ग्रामीण संस्कृतीची जोपासना करण्यासाठी व नव्या पिढीला जुन्या रुढी परंपरा राहणीमान याची नव्यानं ओळख व्हावी या उद्देशाने हा देखावा तयार करण्यात आला आहे.