उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त पार पडलेल्या महाराष्ट्र युथ कार्निवलच्या निवड चाचणी स्पर्धेत उस्मानाबाद येथील आरेफअली कोतवाल याने बाजी मारली आहे. त्याची महाराष्ट्र युथ कार्निवलच्या अंतिम फेरीसाठी निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्याचा सत्कार केला.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र युथ कार्निवल या स्पर्धात्मक उपक्रमाच्या माध्यमातून चित्रकला, नृत्य, गायन, मॉडेलिंग अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. गाव पातळीवरील कलाकारांना राष्ट्रीय पातळीवर आपल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी संधी व व्यासपीठ निर्माण होण्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने ही स्पर्धा घेण्यात आली होती. यातून चांगला कलावंतांची निवड करून त्यांना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवडण्यात येते. या स्पर्धेसाठी उस्मानाबाद येथील आरेफअली  रफत कोतवाल याची निवड झाल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उस्मानाबाद दौर्‍यावर आल्यानंतर कोतवाल यास प्रशस्तीपत्र व बक्षिसाचा धनादेश देवून सन्मान केला. आरेफअली कोतवाल हे उस्मानाबादचे रहिवाशी असून ते राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक रफतअली कोतवाल यांचे चिरंजीव आहेत.


 
Top