बीडीएस परिक्षेतही संपादन केले होते उज्ज्वल यश


उस्मानाबाद - प्रतिनिधी

तालुक्यातील बेंबळी येथील डॉ. शामली नागेश गिरवलकर यांनी एमडीएस परिक्षेत विशेष प्राविण्यासह यश मिळवले असून ऑगस्ट २०२२ मध्ये या परिक्षा घेण्यात आल्या होत्या.

डॉ. गिरवलकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा येथील तात्यासाहेब कोरे डेंटल कॉलेज येथून बीडीएस पदवी प्राप्त केली. यामध्येही त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले होते. त्यानंतर याच महाविद्यालयात त्यांना एमडीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. ऑर्थाेडोन्टीस्ट अॅन्ड ऑर्थोफेशियल ऑर्थोपेडिक्ट्स (दंत व्यंगोपचारतज्ञ) या पदयुत्तर पदवीच्या अभ्यासक्रमात त्यांनी विशेष प्राविण्यासह (डिस्टींक्शन) यश मिळवले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेंबळीतील सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे तर माध्यमिक शिक्षण लातूरच्या देशीकेंद्र विद्यालयात झाले आले. दहावी व बारावीच्या परिक्षेतही त्यांनी उत्तुंग यश मिळवले. त्यांचे आजोबा सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता रामलिंगाप्पा गिरवलकर  यांच्यासह बँकेच्या विधी सल्लागार विधिज्ञा अॅड. सुचिता गिरवलकर व त्यांच्या नातेवाईकांनी डॉ. शामली गिरवलकर यांचे कौतुक केले आहे.

 

 
Top