उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या १२ वर्षापासून बंद आहे. तो सुरू करण्यासाठी टेंडर प्रक्रिया पार पडली. मात्र या टेंडर प्रक्रियेवरून भैरवनाथ शुगर व ट्वेंटीवन शुगर यांच्यामध्ये म्हणजेच आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत व माजी मंत्री आ.अमित देशमुख यांच्या २ संस्थेमध्ये वाद निर्माण झाला आहे. न्यायालयात प्रलंबित असून या बाबत भैरवनाथ शुगरचे मंत्री डॉ तानाजीराव सावंत व ट्वेंटीवन शुगरचे आ. देशमुख यांनी न्यायालयाबाहेर आपसात तडजोड करावी व हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करावा. तसेच न्यायालयीन कुरघुड्या बंद करा व तेरणा सुरु करा या एकमेव मागणीसाठी आम आदमी पार्टीच्यावतीने मंत्री सावंत यांच्या माढा तालुक्यातील वाकाव या मुळगावी दि.२३ सप्टेंबर रोजी आम आदमी पार्टीचे राज्य समिती सदस्य ऍड. अजित खोत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलकांना वेशीवरच पोलिसांनी अडविले. दरम्यान, आंदोलकांना आंदोलनस्थळी चेअरमन शिवाजीराव सावंत यांचे चिरंजीव ऋतुराज यांनी प्रत्यक्ष येऊन निवेदन स्विकारून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

 तेरणा कारखाना सुरू करा या एकमेव मागणीसाठी मंत्री तानाजीराव सावंत यांच्या माढा तालुक्यातील वाकाव या मुळ गावी  न्यायालयीन कुरघोड्या बंद करा तेरणा कारखाना सुरु करा यासाठी धरणे आंदोलन आम आदमी पार्टीचे राज्य समितीचे सदस्य ऍड. अजित खोत यांच्या नेतृत्वात करण्यात आले. परंतू  मंत्री डॉ.सावंत यांनी प्रशासनावर दबाव टाकून  पोलिसांमार्फत आंदोलनकास गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर अडविले. यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच बैठे आंदोलन केले. यावेळी तेरणा कारखाना लवकर सुरू करावा व न्यायालयीन लढा बंद करावा अशा विविध घोषणा दिल्या. यावेळी आंदोलनस्थळी चेअरमन शिवाजीराव सावंत यांचे चिरंजीव ऋतुराज सावंत यांनी निवेदन स्विकारून तेरणा कारखान्याचा विषय न्यायालयात न अडकविता लवकरच कारखाना सुरू करू असे आश्वासन दिले. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाप्रमुख राहुल माकोडे, उपाध्यक्ष पिंपळे, सचिव मुन्ना शेख, कोषाध्यक्ष विकास वाघमारे, युवक अध्यक्ष आकाश कावळे, शहर सचिव वाघमारे, गुणवंत कावळे आदीसह पदाधिकारी, शेतकरी सभासद, शेतकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.


 
Top