परंडा प्रतिनिधी - 

परड्यांचे भुमीपुत्र महादेव विटकर गुरूजी यांचे सुपुत्र ऋषीकेष विटकरने  स्केटिंग या खेळ प्रकारात चमकदार कामगिरी करत विविध ठिकाणच्या स्पीड स्केटिंग व स्केट बोर्ड स्पर्धेत जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळविले आहे.

विशेष म्हणजे स्केटिंग हा खेळ प्रकार काय असतो हे आपणा बहुतेकांना माहीत नाही,परंड्या सारख्या ग्रामीण भागात राहून स्केटिंग या खेळ प्रकाराकडे ऋषीकेष ची नजर गेली नि २०१६ मध्ये इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण ता.कोपरगाव जि.अहमदनगर येथून त्याने स्केटिंग या खेळाचे धडे घेतले, येथूनच त्याची स्केटिंग या खेळाविषयी आवड निर्माण होऊन सुरूवात झाली.

२०१७ पासून त्याने पुणे, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत जिद्दीने गोल्ड मेडल मिळवली व परंडा तालुक्याच्या सन्मानात मानाचा तुरा रोवला.स्केटिंग या खेळाचा सन्मान वाढविण्यासोबतच सायबर सिक्युरिटी मध्ये करिअर करून देशसेवा करण्याचा त्याचा मानस आहे.

   त्यांच्या या जिद्दीला, चिकाटीला , मेहनतीला दाद म्हणून प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या सत्कार प्रसंगी प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, अंकुश सरवदे , महादेव विटकर सर व विटकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


 
Top