तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातुन जाणारा  चेन्नई -सुरत  राष्ट्रीय महामार्गरस्ता काम   भूसंपादनाचा मावेजा मिळाल्या शिवाय पुर्ण होवू देवू नका,  अशी सुचना स्वाभिमानीशेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजूशेट्टी यांनी सुरतगाव (ता.तुळजापूर) येथे बाधीत शेतकऱ्यांच्या बैठकीत िदली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष   राजू शेट्टी हे सोमवारी  तुळजापूर तालुक्याच्या दौऱ्याला आला असता   सुरतगावातील  दत्त मंदिर येथे चेन्नई सुरत  एक्सप्रेस राष्ट्रिय महामार्गात जात असलेल्या अकरा गावच्या बाधीत शेतकऱ्यांची बैठक घेतली.

 यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, धनाजी पेंदे, राजाभाऊ हाके , गुरुदास भोजणे, डाँ.अनिल धनके, शहाजी सोमवंसे , रामेश्वर  तोडकरी,  विजय जाधव, दयानंद नेताजी, जमदाडे आदी मान्यवर उपस्थितीत होते . 

 
Top