तुळजापूर / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी  श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरातुन भवानी ज्योत प्रज्वलित करुन नेण्यासाठी राज्यातील सार्वजनिक नवराञोत्सव मंडळाचे कार्यकते प्रचंड संख्येने वाजत गाजत आई राजा उदोचा गजर करीत दाखल होवुन भवानी ज्योत प्रज्वलित करुन गावी रवाना होत असल्याने शनिवारी तिर्थक्षेञी तरुणाईचा जागर दिसुन आला 

शनिवारी  पहाटे पासुन मंदीरात हजारो भवानी ज्योत प्रज्वलित करुन नवराञोत्सव मंडळांनी देविस्थापने साठी गावी रवाना झाले. दरम्यान  तिर्थक्षेञ तुळजाईनगरीत पोलिसांनी सुरक्षा यंञणा कडक केली आहे.

  कर्नाटकातील भाविकांची गर्दी !

कर्नाटक राज्यात देविभक्त कोट्यावधी असुन हे देविभक्त  घटस्थापनासाठी लागणारे श्रीफळ मंदीरातुन भोगीपुजा करुन मगच घटस्थापना करतात. या पार्श्वभूमीवर सध्या कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या संख्येने तिर्थक्षेञी दाखल होवुन घटासाठी लागणारे श्रीफळ भोगीपुजा करुन नेत आहेत. नवराञोत्सवापुर्वी कर्नाटकातील लाखभर भाविक तिर्थक्षेञी येतात.

  शहरात बँरेकेटींगचे रक्षाकवच

 शारदीयनवराञउत्सवा पार्श्वभूमीवर शहरात सर्वञ बँरेकेटींग लावुन शनिवार दुपारी चार वाजल्या पासुन वाहने शहरात सोडणे बंद केले आहे.

रविवार पासुन राज्यासह परराज्यातील सार्वजनिक नवराञोत्सव मंडळे मोठ्या संखेने येतात या पार्श्वभूमीवर रविवारी सांयकाळ पासुन लाखोच्या संख्येने  तरुणाई येते .त्यामुळे रविवार पासुन तिर्थक्षेञ तुळजापूरात अश्विनी पोर्णिमे पर्यत फक्त तुळजाई  चा जागर होणार आहे.   भवानी तिर्थ कुंड आज पासुन स्नानासाठी खुले करण्यात आले आहे तर बाहेर पडण्यासाठी मातंगीदेवि मंदीर समोरून व निंबाळकर दरवाजा मार्ग असणार आहे.

 


तीन भाषेत सुचना फलक !

 शारदीय नवराञ उत्सवात महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र,  तेलगंणा येथील भाविक मोठ्या संख्येने येत असल्याने भाविकांना सुचना देणारे फलक मराठी,  कन्नड, तेलगु  तीन भाषेत लावले आहेत .

  घाटशिळ दर्शन लगतची जागा पकडण्यासाठी झुंबड ! 

 घाटशिळ वाहन तळा कडे जाण्यासाठी रस्त्यावर  बँरेकेटींग लावाल्याने बँरेकेटींग लगत असणारी   नगरपरिषद ची जागा व्यवसायासाठी  घेण्यासाठी शुक्रवार पासुन झुंबड होती काही ठिकाणी व्यवसायसाठी  जागा पकडण्यासाठी शाब्दीक चकमक उडुन हाणामारीची वेळ आली होती.


 
Top